नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) नाशिक शहरातील चार मतदारसंघांपैकी तसेच नाशिक जिल्ह्यामधील (Nashik District) मतदार संघातील एकही जागा अद्यापही काँग्रेसला (Congress) सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराज असून या निषेधार्थ गुरुवारी(दि.२४) काही नाराजांनी नाशिक शहर काँग्रेस कमिटीला टाळे ठोकून आंदोलन केले.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत; हिरे, बडगुजर, पाटील निवडणूक मैदानात
काँग्रेसच्या नेत्यांनी व प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आणि शहर अध्यक्षांनी काँग्रेसला जागा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले नाही. यामुळे काँग्रेसला नाशिकमध्ये (Nashik) एकही जागा मिळाली नसल्यामुळे शहरामध्ये काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे कट्टर काँग्रेसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्यातील खदखद बाहेर काढून स्वपक्षाच्या कार्यालयाला टाळे ठोकले आणि काँग्रेसच्या नेत्यांचा व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.
हे देखील वाचा : Nashik Political : नांदगावमध्ये महायुतीत बंडखोरी; समीर भुजबळांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
दरम्यान , याप्रसंगी काँग्रेस नेते सुरेश मारु, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, पंचवटी ब्लॉकचे अध्यक्ष उद्धव पवार, सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजू पाटील, सातपूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कडलक, पदाधिकारी भरत पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, ज्युली डिसूजा, युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष जयेश पोकळे, जावेद पठाण, देवाभाऊ देशपांडे, देवेन मारू, कैलास महाले, महेश देवरे, अण्णा मोरे, राजकुमार जेफ, फारुख मन्सुरी, जयदीप चौधरी, अशोक लहामगे आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा