Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMonsoon Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, किरीट सोमय्यांचा...

Monsoon Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, किरीट सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक

बोगस बियाणांसंदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस बियाणांविषयी बोलताना मोठी घोषणा केली आहे. बोगस बियाणांसंदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, बोगस बियाणांबाबत निर्णय केला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याठी कारवाई व्हावी यासाठी बिटी कॉटनप्रमाणे कायदा करणार आहोत. त्यासाठी समिती नेमली आहे. याच अधिवेशनात बोगस बियाण बाबत कायदा आणला जाईल, असेही मुंडे म्हणाले.

- Advertisement -

खताच्या किमतीवरून विधानसभेत खडाजंगी

खताच्या किमतीवरून विधानसभेत खडाजंगी

विजय वडेट्टीवार यांनी खतांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवरती 20 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर मग या ठिकाणी कमी का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. अधिकचा दर देऊन खत खरेदी करावा लागत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यावर उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खतांच्या दरात घट झालेली आहे अशी माहिती दिली.

विधानभवानच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवानच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधक आंदोलन करत आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, सोमय्या यांना सुरक्षा देणाऱ्या सरकारच्या धिक्कार असो, अशा घोषणा विरोधक करत आहेत.

भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी – अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.

नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती पदासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता

आज देखील सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती पदासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता आहे. काल अंबादास दानवे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. भाजपचे माजी खासदार व विरोधकांवर सातत्याने आरोप करून त्यांना अडचणीत आणणारे किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या अडचणीत सापडले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद तसेच विधानसभेतही किरीट सोमय्यांचा मुद्दा गाजला. आजदेखील या मुद्दयावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.

तसेच, राज्यात पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या, शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीची न मिळालेली नुकसान भरपाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव यावरूनही महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केले आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. माझ्याकडे सोमय्यांचे 8 तासांचे व्हिडिओ आहेत ते मी सभापतींकडे देणार आहे. असा हा भाजपचा नेता म्हणजे किरीट सोमय्या. माझ्याकडे या देशद्रोही नेत्यांच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

तुम्ही सोयीप्रमाणे उत्तर देत आहात. तुम्ही मुंबई संपवण्याचा प्रयत्न करत आहात का? नाल्यावर अनधिकृत काम करणाऱ्या बिल्डरला मुदत देत आहात. हे बंद होणार का आणि तेथील पाणी समुद्रात जाण्याची सोय करणार का?

नाना पटोले

अंधेरी सबवे संदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित

अंधेरी सबवे तुंबू नये यासाठी दीड किलोमीटरचा मायक्रो टनलिंग न तयार न करता त्याच्या समोरेचं बांधकामं फ्री करून अंधेरी सबवेचं पाणी मिलानियर इमारतीच्या खाली टाकून अंधेरी सबवेला बंद होण्यापासून मुक्त करणार का? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला गेला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे.

विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं. शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. त्यामुळे आज देखील शेतकऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर विधिमंडळात हे प्रकरण मांडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विधिमंडळात आज हे प्रकरण गाजण्याची चिन्हे असून विरोधकांडकून ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन शपथ घेतलेल्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी, बोगस बियाणे, पावसाचे संकट, दुबार पेरणी असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून काही वेळातच विधानसभेचे कामकाज एका दिवसासाठी स्थगित करण्यात आले होते.

विधानपरिषदेत विरोधकांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यांच्या निलंबनासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तर काही वेळाने विधापरिषदेचे कामकाजही कालच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आले.दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश भालचंद्र बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्या नंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.

पेरण्या कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज आहे. राज्यात पेरण्या कमी झाल्या तर त्यासाठी सरकारकडून प्लान तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. बोगस बियानांवर कारवाई होईल. या संदर्भात कायदा अधिक कठोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक व्यवस्था आपण सुरू केली आहे, ज्यानुसार बियाने, खते यात बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या संदर्भात संबंधितांना अपात्र करून त्यांच्यावर कायदेशीर करावाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

– देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला. ‘वंदे मातरम्’ ने सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सुरूवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला.विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ‘घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार’ अशा प्रकारचे फलक आमदारांनी दाखवले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला. राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व नऊ मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला. विधिमंडळाचं कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले होते.

देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत.अजित पवार गट विधानसभा भवनात दाखल झाला आहे. अजित पवार गटाचे सर्व मंत्री आता विधानसभा भवनामध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत अभिवानद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी कामाला सुरूवात केली असून या अधिवेशनात त्यांच्यावर विरोधक हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा वचरष्मा राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या