Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानभवनात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास; काय झाली चर्चा?

विधानभवनात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास; काय झाली चर्चा?

चंद्रकांत पाटलांनीही दिले ठाकरेंना चॉकलेट

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून सुरूवात झाली आहे.कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवविला जात आहे. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच सुखद चित्र पाहायला मिळाले आहे.

हे देखील वाचा : “मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा”; उद्धव ठाकरेंचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान

अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच १५ मिनिटे अगोदर विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर ते विधानभवनातील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या दालनात गेले. त्याचवेळी भाजपचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.या भेटीनंतर दोघांमध्ये हस्तविनोद झाला.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांना एक भलेमोठे चॉकलेट दिले.

हे देखील वाचा : यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी होणार; ‘या’ विषयांवर होऊ शकते चर्चा

त्यानंतर अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) दालनात आल्यावर त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स ठेवत “दादा लोकसभा निवडणुकीत आमचे ३१ खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे म्हटले. यानंतर पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना भरवत “मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो”, असे म्हटले. अनिल परब हे नुकत्याच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात असून या निवडणुकीचा निकाल १ जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुकीआधी भाजपची वेगळी चाल; ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विधानभवनात भेट झाली. त्यानंतर दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी लिफ्टमध्ये जाताना दोघांमध्ये चर्चा होतांना दिसून आले. यावेळी लिफ्टमध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर ठाकरे आणि फडणवीस हे जुने सहकारी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात पुन्हा एकदा नवे राजकीय समीकरण दिसणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा : Rain Update News : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे

भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही

लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणारे प्रवीण दरेकर म्हणाले की, “मी लिफ्टमध्ये शिरत असताना देवेंद्रजी आणि उद्धवजी तेथे आले. त्यावेळी कोणीतरी म्हणाले की तुम्ही दोघे एकत्र आला हे पाहून समाधान वाटले. मात्र, उद्धवजी म्हणाले याला आधी बाहेर काढा. मी त्यांना म्हटलो तुमचे अजुनही समाधान झालेले दिसत नाही. होताय का एकत्र? त्यावेळी ते म्हणाले बोलता तसे करा. आमच्यात हस्यविनोद झाले.ते विरोधी पक्षाच्या दिशेने गेले आम्ही सत्तेच्या दिशेने. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. असे त्यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या