Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजयंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी होणार; 'या' विषयांवर होऊ शकते चर्चा

यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी होणार; ‘या’ विषयांवर होऊ शकते चर्चा

मुंबई | Mumbai
आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन विविध विष वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याने सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात घेरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. विरोधक राज्यातील ड्रग्ज, महागाई, शेतकरी, आणि पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनीदेखील रणनिती आखली आहे.

विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी तर विधानसभेची अंदाजित तारीख पण जाहीर केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जय्यत तयारी सुरु केली आहे.

- Advertisement -

लोकसभेतील सकारात्मक विजयाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर महायुती वचपा काढण्यासाठी रणनीती आखत आहे. त्यासाठी विधानसभेच अधिवेशन अत्यंत फायदेशीर राहण्याची शक्यता असून याचा दोन्ही गट पुरेपुर वापर करु शकता. राज्यातील अनेक मुद्यांवर वातावरण तापेल, तर सरकार बाजू सावरण्यासाठी मोठ्या घोषणा करेल.

दरम्यान यंदा ३ आठवडे चालणार्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. गुरुवारी २७ जूनपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाचा समारोप १२ जुलैला होणार आहे. साधारण ३ आठवडे चालणारे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.

दरम्यान, फेब्रुवारीत जेव्हा राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. तेव्हा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला नव्हता. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात हा पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या निमित्ताने राज्य आर्थिक सामाजिक प्रगतीच्या आघाडीवर आहे की पिछाडीवर आहे, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, नीट परीक्षा रद्द , बोगस बियाणे, ज्यादा भावात बियाणे विक्री, बेरोजगारी, अटल सेतू भेगा, शेतकरीला मदत न करणे, शेतकरीला पीक कर्ज न देने, कायदा सुव्यवस्था, पोलिस भरती रद्द, पुणे हिट अँड रन प्रकरण.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : छत्रपतींच्या समाधीपेक्षा वाघ्या दंतकथेची उंची मोठी का?; संभाजीराजेंचा...

0
मुंबई । Mumbai गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत आल्याचं दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून...