Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मोठी बातमी! विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या (SSC and HSC Exam Date) तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

YouTube video player

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा : लेखी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षांचा समावेश असेल.

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा : लेखी परीक्षा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत संपतील.

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रक

इ.१२वी प्रात्यक्षिक परीक्षा : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) साठी, NSQF अंतर्गत व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह, प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ ते सोमवार, दि. ०९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित केले जातील. यात माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान

विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा देखील समावेश आहे.

इ.१० वी प्रात्यक्षिक परीक्षा : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१०वी) साठी, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. यामध्ये शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असेल.

दरम्यान, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी दोन्ही फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे तारखा विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...