Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Board HSC Result 2026 : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी...

Maharashtra Board HSC Result 2026 : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी कमी; कुठल्या विभागाचा सर्वाधिक?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (दि.०२) रोजी पत्रकार परिषद घेत बारावी परीक्षेचा (HSC Result) निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनी (Girl Student) बाजी मारली आहे. यंदा राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के लागला असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.१५ टक्के इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८६.८० इतकी आहे.

यंदा कोकण विभागाचा (Kokan Division) निकाल ९४.१४ टक्के इतका लागला असून तो अव्वल ठरला आहे. तर लातूर विभागाचा (Latur Division) ८४.१४ टक्के म्हणजे सर्वात कमी निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी कमी झाली आहे. यावर्षी बारावी विज्ञान विभागाचा निकाल ९६.४४, वाणिज्य ८७.०३ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने बारावी परीक्षेचा निकाल बघता येणार आहे.

गेल्यावर्षी निकालाची टक्केवारी किती होती?

गेल्या वर्षीच्या निकालाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९१.८८ टक्के होती. दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीही मुलींनीच आघाडी घेतली होती. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.५४ टक्के इतकी होती, तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८९.५१ टक्के एवढी होती.

हे देखील वाचा : Maharashtra Board HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल; ‘या’ अधिकृत लिंकवर बघता येणार रिझल्ट

किती विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा?

यावर्षी सुमारे १४.२७ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. तसेच या परीक्षेसाठी ५९ हजार ८७६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हजार ३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार ३४९ विद्यार्थी (३६.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर, खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील २९ हजार ६३४ विद्यार्थी (८०.२१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?

  • कोकण ९४.१४
  • पुणे ९१.२५
  • अमरावती ९०.९२
  • नाशिक ९०.७२
  • मुंबई ९०.०८
  • नागपूर ८८.६७
  • छत्रपती संभाजीनगर ८८.६८
  • कोल्हापूर ८९.९७
  • लातूर ८४.१४

या वेबसाईटवर बघता येणार निकाल

निकाल बघण्यासाठी काय आवश्यक

१. विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)

२.आईचे नाव (Mother’s First Name)

ताज्या बातम्या

Jalna : विखे पाटलांनी शरद पवारांकडे दाखवलं बोट

0
जालना | Jalna अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...