मुंबई | Mumbai
आज (दि.०२ मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावी परीक्षेचा (HSC Exam Result) निकाल जाहीर केला जाणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषदेत दिली जाईल. यात राज्याचा निकाल, विभागाचा निकाल आणि राज्यातून किती विद्यार्थ्यांना (Student) शंभरी गाठता आली हे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा बारावीच्या निकालाकडे लागून आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आली. त्यानंतर आज (दि.०२ मे) रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या निकालाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९१.८८ टक्के होती. दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीही मुलींनीच आघाडी घेतली होती. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.५४ टक्के इतकी होती, तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८९.५१ टक्के एवढी होती.
दरम्यान, यंदा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये बारावीची परीक्षा पार पडली. राज्यभरातून सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वेबसाईटवर बघता येणार निकाल
निकाल बघण्यासाठी काय आवश्यक
१. विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)
२.आईचे नाव (Mother’s First Name)





