Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget 2022 : राज्याचा 'महाअर्थसंकल्प' विधिमंडळात सादर, शेतकऱ्यांसाठी भरभरुन घोषणा.. वाचा...

Maharashtra Budget 2022 : राज्याचा ‘महाअर्थसंकल्प’ विधिमंडळात सादर, शेतकऱ्यांसाठी भरभरुन घोषणा.. वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Govt) तिसऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊयात या महत्त्वाच्या मोठ्या घोषणा

- Advertisement -

आजच्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी ३०२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केलं होतं पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं. पण ही वचनपूर्ती आता होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे.

भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसंच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाईल.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल.

वसमत येथे हळद संशोधन केंद्र उभारणार असून त्यासाठी १०० कोटीची तरतूद करण्यात आली.

माजी सैनिकांसाठी यापुढे कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३ टक्के निधी राखीव ठेवला जाईल.

१ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे क्षेत्र

६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देणार

पीक कर्ज वाटपात वाढ करणार

येत्या दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

कोकण आणि परभणी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्यात येणार

- Advertisment -

ताज्या बातम्या