Sunday, March 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'पुंडलिक वरदे हरी विठ्ठला'चा गजर करत अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा

‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठला’चा गजर करत अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुंबई । Mumbai

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज १० व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. २०२४-२५ वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय…’ असा गजर करत अर्थसंकल्पाला सुरुवात केली. तसेच आषाढी वारीचे औचित्य साधत त्यांनी वारकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे असणार आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

यावेळी अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचं अराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीहून निघेल. हजार वर्षाची परंपरा असलेल्या वारीशी वारकऱ्यांची नाळ जोडलेली आहे. महाराष्ट्राची नाळ वारकरी भक्तिमार्ग जोडलेली आहे. याची जाणीव असल्यानं महाराष्ट्राची ओळख म्हणून पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवत आहोत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रति दिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आणि आळंदी या मार्गावरील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा देण्यासाठी, पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी वारकरी व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं अजित पवार म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Train Accident : ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात; कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डब्बे...

0
दिल्ली । Delhi ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये...