Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet: मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारचे ७ महत्वाचे निर्णय; डेटा प्राधिकरणासह, पशुवैद्यक...

Maharashtra Cabinet: मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारचे ७ महत्वाचे निर्णय; डेटा प्राधिकरणासह, पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापनेस मंजुरी

मुंबई | Mumbai
राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाने या निर्णयांची माहिती जारी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. पण दोघांच्याही अनुपस्थितीची चर्चा रंगली. यामध्ये परळी आणि बारामतीमध्ये पशुवैद्यक महाविद्यालये स्थापन करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ?
1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग)

- Advertisement -

2) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी (वित्त विभाग)

3) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी (मदत व पुनर्वसन विभाग)

4) महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती. (नियोजन विभाग)

5) बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी (कृषि व पदुम विभाग)

6) परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी (कृषि व पदुम विभाग)

7) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता (सार्वजनिक बांधकाम विभाग)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...