Wednesday, February 4, 2026
Homeक्रीडामहिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या महाराष्ट्रातील खेळाडूंबाबत मोठी CM फडणवीसांची मोठी घोषणा

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या महाराष्ट्रातील खेळाडूंबाबत मोठी CM फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai
साऊथ अफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने वन डे विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या विश्वविजेत्या संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. या तीन खेळाडूंसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्य सरकारच्या वतीने या महिला खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर माध्यमांसमोर ही घोषणा केली आहे. भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता त्यांच्यावर बक्षिसांची बरसात केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तीन खेळाडू असलेल्या स्मृती मनधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या तीन खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने केला जाणार आहे. आपल्या धोरणानुसार त्यांना रोख स्वरुपात दिले जाईल. भारताची मान उंचावणाऱ्यांचा सर्व प्रकारे सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात जेव्हा शक्य असेल, संपूर्ण टीम मुंबईत असेल, त्या टीमचा सत्कार करु” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंना किती रोख पारितोषिक दिले जाईल? याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर टीम इंडियाच्या मेन्स खेळाडूंचा देखील सत्कार राज्य सरकारने केला होता. यामध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता.

YouTube video player

दरम्यान, टीम इंडियाने रविवारी विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर सोमवारी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी संघातील महिला क्रिकेटपटू रेणुका सिंग ठाकूर हीच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रेणुका ठाकुर हिच्याशी फोनवर चर्चा करून तिला १ कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर रेणुका ठाकूरला नोकरीची ऑफर दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत नोंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व इतर व्यवस्थापनाच्या चौथी व सातवीच्या 84 हजार 704 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज...