Friday, April 25, 2025
HomeनगरMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नजीक चिंचोलीतील आत्या-भाच्याला विशेष निमंत्रण

Maharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नजीक चिंचोलीतील आत्या-भाच्याला विशेष निमंत्रण

नेवासा । तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील नजिक चिंचोलीच्या सौ.रेणुका सुनील गोंधळी व त्यांच्या १० वर्षे वयाचा भाचा वेदांत भागवत पवार यांना उद्या गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी होत असलेल्या महायुती सरकारच्या (देवेंद्र फडणवीस) शपथविधि सोहळ्यास विशेष अतिथी (VIP) म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

- Advertisement -

नजिक चिंचोलीच्या रहिवाशी असलेल्या सौ.रेणुका सुनील गोंधळी यांचा कनकोरी (ता.गंगापुर) येथील भाचा वेदांत हा २०१९ मध्ये ६ वर्षे वयाचा पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित होता. वेदांतचे वडील वाळुंज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्या परीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले.

मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अडचणीचे ठरू लागले. पालकांची सारी पूंजी त्यासाठी खर्ची पडली, त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले.अशा वेळी आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी या नगर जिल्ह्यातील नजीक चिचोली (ता. नेवासा) येथे राहतात. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून मद‌तीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला.

या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ १ लाख ९० हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रेन रुग्णालयात बेदांतवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे या बालकाला जीवनदान मिळण्यास मदत झाली. मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले होते.

तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभीष्टचिंतनाचे औचित्य साधून श्रीमती रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले. ही घटना लक्षात ठेऊन महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी शिवशाहीर सुनिलजी गोंधळी, सौ.रेणुका सुनिल गोंधळी व वेदांत भागवत पवार यांना महायुती सरकारच्या शपथविधि सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...