Tuesday, October 20, 2026
HomeनगरNewasa : अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यात केळी पिकाचे प्रचंड नुकसान

Newasa : अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यात केळी पिकाचे प्रचंड नुकसान

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या केळी, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान कृषी विभागाच्या माहितीनुसार दि.20 मे रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने तालुक्यातील वरखेड, गिडेगाव, खामगाव, शिरसगाव, जेऊर हैबती, माका, महालक्ष्मीहिवरे, रामडोह, गोपाळपूर या 10 गावातील 52 शेतकर्‍यांचे 27.30 हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब, केळी, आंबा, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यात गेल्या आठवड्यात जोराच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात डाळिंब, केळी, आंबा, बाजरी या पिकांचे तसेच कांदा, कडधान्य, भुईमूग, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाल्याची माहिती आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik News : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १३ कोटींचा कृती आराखडा; ७७७...

0
नाशिक | Nashik नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी ८४...