मुंबई | Mumbai
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महायुती सरकारचा (Mahayuti Governtment) ‘महा’ शपथविधी सोहळा आज (दि.०५ डिसेंबर) रोजी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीकडून (Mahayuti) जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर आज सायंकाळी ५.३० वाजता हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
हे देखील वाचा : Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन करून शपथ घेतली. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे हे राज्यात उममुख्यमंत्री म्हणून भूमिका पार पाडतील. मात्र, शपथविधीवेळी सर्वांच्या नजरा फक्त काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत्या.या शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून ते नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. त्यांच्या देहबोलीमध्ये नेहमीचा उत्साह अजिबात दिसून आला नाही. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत ते कोणत्या तरी खोल विचारात असल्याचे सातत्याने त्यांच्या देहबोलीवरून दिसून आले.
हे देखील वाचा : Maharashtra DCM Oath : अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी (CM Post) संधी मिळत नसल्याने प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्रीपद सुद्धा स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, पक्षातील आमदारांनी त्यांना आग्रह केल्याने तसेच तुम्ही जर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसाल तर आम्ही सुद्धा शपथ घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर ते उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार झाले. त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Oath) घेतली.
हे देखील वाचा : Eknath Shinde : शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; ‘असा’ आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास
तसेच आजच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरचा बायो देखील बदलण्यात आला आहे. या ट्विटरच्या बायोमध्ये उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे शिंदे दुसरे नेते ठरले आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्री स्वीकारलं होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद (DCM) स्वीकारले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपद मिळावे, असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता.मात्र, भाजपचा गृहमंत्रिपदावर दावा कायम होता. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.