मुंबई | Mumbai
ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचे (Strike) हत्यार उपसले आहे. अनेक जिल्ह्यातून या संपाला पाठिंबा मिळत असल्याने लालपरीची चाके थांबली आहेत. एसटी बसेस सकाळपासून डेपोमध्येच उभ्या असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. सरकारने तातडीने हा संप मिटवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. अशातच आता राज्य सरकारने हा संप मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आले आहे.
हे देखील वाचा : ऐन सणासुदीत ‘लाल परी’ची चाके थांबली, प्रवाशांना मोठा फटका
एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees Strike) पुकारलेल्या संपाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून एसटी कामगार संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. यात एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील लवकरच एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : ३ सप्टेंबर २०२४ – जनसाक्षरता बदल घडवू शकेल
दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव आणि सदस्य कृती समितीचे सदस्य सुनील गडकरी (Sunil Gadkari) यांनी १३ आगारातील सर्वच कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा केला. राज्य सरकार लाडकी बहीणसह विविध योजना राबवित आहे. वीज कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ (Increase) दिली गेली. परंतु, राज्य परिवहन महामंडळाच्या वेतन करार २०१६ पासून प्रलंबित आहे. मध्यंतरी सरकारने २० ऑगस्टपर्यंत वेतनाबाबत अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र अद्याप ती बैठक झाली नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.
हे देखील वाचा : मनमाड – इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी
नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
राज्य सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ यांसारख्या योजना राबवित असताना राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत विभागातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे एसटी बससेवा पूर्णत विस्कळीत झाली. मंगळवारी सकाळपासून आंदोलकांनी आगारातून एकही बस बाहेर पडू दिली नाही. परिणामी, पुणे, मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बसअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी घेणे भाग पडले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा