Tuesday, October 22, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य सरकारकडून शेतकर्‍यांना कोट्यवधी!

राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना कोट्यवधी!

दोन वर्षात विविध योजनांतून मोठी मदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे आणि जिल्हा प्रशासनाने प्रभाविपणे राबविलेल्या विविध योजनांमुळे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षात शेतकर्‍यांना दिलासा देण्यासोबत कृषी विकासाला गती मिळण्यास मदत झाली आहे. यात शेतकर्‍यांच्या पदरात सरकारच्यावतीने कोटी कोटींची मदत देण्यात यश आले आहे. यात कांदा अनुदान योजना 2022-23 अंतर्गत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात 55 हजार 368 लाभार्थी असून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे रुपये 115 कोटी 96 लाख 64 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या 1 लाख 500 शेतकर्‍यांना बँकांकडून घेतलल्या अल्प मुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50 हजार या कमाल मर्यादेत रुपये 362 कोटी 23 लाख एवढा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला.

- Advertisement -

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप व रब्बी हंगामात गेल्या तीन वर्षात 5 लक्ष 13 हजार 37 शेतकर्‍यांना 11 अब्ज 65 कोटी 47 लाख 92 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील 37 हजार 71 शेतकर्‍यांना 62 कोटी 45 लाख 21 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षात 732 शेतकर्‍यांना 14 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान अंतर्गत 308 शेतकर्‍यांना 6 कोटी 6 लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनांवर गेल्या तीन वर्षात 26 कोटी 54 लाख 44 हजार रुपये खर्च करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत गेल्या 3 वर्षात जिल्ह्यातील 18 हजार 633 शेतकर्‍यांना कृषी औजारे खरेदीसाठी 108 कोटी 53 लक्ष 50 हजार रुपयांचे अनुदान वितरित. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात 987 प्रकल्पांना 38 कोटी 89 लाख 24 हजार रुपयांचे उनदान वितरित. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक सुक्ष्म योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील 36 हजार 54 लाभार्थ्यांना 87 कोटी 2 लाख 91 हजार 57 रुपयांचे अनुदान वितरित झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या