Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशST Bus Attack: कन्नडिगांची मुजोरी! कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला, चालकाला काळं...

ST Bus Attack: कन्नडिगांची मुजोरी! कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला, चालकाला काळं फासून मारहाण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटकमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकावर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड भाषा येत नसल्याच्या कारणावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी या चालकाच्या तोंडाला काळे फासले. या घटनेमुळे सीमावर्ती भागात संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे घडली. मुंबई-बंगळुरू एसटी बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. चालकाला वाहनातून खाली उतरवून, “कर्नाटकात यायचं असेल, तर कन्नड बोलावीच लागेल,” असा दम देण्यात आला. या घटनेची माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली असून, महाराष्ट्रात या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

- Advertisement -

या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात आंदोलन सुरू केले आहे. तसेच, राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेत तात्पुरते कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बसेस थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

याआधीही कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसेसवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. कन्नडिगा कार्यकर्त्यांकडून वारंवार अशा प्रकारच्या मुजोरीचे प्रकार होत असल्याने महाराष्ट्रात संताप वाढला आहे. या हल्लेखोरांनी माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता महाराष्ट्र सरकार या संदर्भात कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...