Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Local Body Election 2025 : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांची...

Maharashtra Local Body Election 2025 : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा; कोणत्या जिल्ह्यात कुठं रणधुमाळी?

मुंबई | Mumbai

राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेत राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ०३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

- Advertisement -

या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर अशी राहील. तसेच २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. त्याचबरोबर २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणुकीत एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ पात्र मतदार ६ हजार ८५९ जागांसाठी मतदान करतील, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

YouTube video player

दरम्यान, निवडणूक आयोगाने ही घोषणा केल्यानंतर राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी निवडणूक होईल, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. त्यानंतर आता कुठल्या जिल्ह्यात किती नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे, हे जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा : Local Body Election 2025 : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी; ‘असा’ आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचायती

पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि बाडा (न.पं). रायगड अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.).

रत्नागिरी – चिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर आणि राभागिरी.

सिंधुदूर्ग – कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी आणि वेंगुलां.

ठाणे – अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर

अहिल्यानगर – देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिडी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर,

धुळे – दोंडाईचा-वरवाडे, पिपळनेर, सिंदखेडा (न.पं.) आणि शिरपूर वरवाडे,

जळगाव – जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), वरणगाव आणि यावल,

नंदूरबार – शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा,

नाशिक – भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर,पिंपळगांव बसवंत आणि त्र्यंबक.

कोल्हापूर – आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव.

पुणे – आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव खु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव (न.पं.).

सांगली आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पलूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा.

सातारा- कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेडा (न.पं.), महसवड, पाचगणी, फलटण,

रहिमतपूर, सातारा आणि वाई.

सोलापूर – अक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), वाशी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मेदगी, मंगळवेडा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला.

बीड – अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी वैजनाथ,

छत्रपती संभाजीनगर – फूलझी (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर,

धाराशिव – भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा.

हिंगोली – बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी.

जालना – अंवड, भोकरदन आणि परतूर,

लातूर – अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.) आणि उदगीर,

नांदेड – बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा,

परभणी – गंगाखेड, जितूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ,

अकोला – अकोट, बाळापूर, वाशी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा,

अमरावती – अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोशी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट आणि वरुड,

बुलढाणा – बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेगाव आणि सिंदखेडराजा.

वाशीम – कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड आणि वशीम, यवतमाळ आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी,

यवतमाळ – ढाणकी (न.पं.), नेर- नवाबपूर आणि पांढरकवडा,

भंडारा – पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा,

चंद्रपूर- वल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.). ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, पुग्धुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा.

गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली.

गोंदिया – गोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.) आणि तिरोडा.

नागपूर – बहादुरा (न.पं.), बेसा पिपळा (न.पं.), भिवापूर (न.पं.), बुटिकोरी, डिगडोह, कळमेश्वर- ब्रह्मणी, कामठी, कोद्री कन्हान (न.पं.), काटोल, खापा, कोंडाळी (न.पं.), महादुला (न.पं.), मोहपा, मौदा (न.पं.), नरखेड, निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, विडगाव-तरोडी (खु) पांडुर्णा (न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.), कन्हान- पिपरी, मोवाड, वाडी आणि पेरखेडा (न.पं.).

विभागनिहाय संख्या

कोकण विभाग एकूण- 27

  • पालघर- 4
    ⦁ रायगड- 10
    ⦁ रत्नागिरी- 7
    ⦁ सिंधुदूर्ग- 4
    ⦁ ठाणे- 2

नाशिक विभाग एकूण- 49

अहिल्यानगर- 12
⦁ धुळे- 4
⦁ जळगाव- 18
⦁ नंदूरबार- 4
⦁ नाशिक- 11

पुणे विभाग एकूण- 60

  • कोल्हापूर- 13
    ⦁ पुणे- 17
    ⦁ सांगली- 8
    ⦁ सातारा- 10
    ⦁ सोलापूर- 12

छत्रपती संभाजीनगर एकूण- 52

छत्रपती संभाजीनगर- 7
⦁ बीड- 6
⦁ धाराशिव- 8
⦁ हिंगोली- 3
⦁ जालना- 3
⦁ लातूर- 5
⦁ नांदेड- 13
⦁ परभणी- 7

अमरावती विभाग एकूण- 45

अमरावती- 12
⦁ अकोला- 6
⦁ बुलढाणा- 11
⦁ वाशीम- 5
⦁ यवतमाळ- 11

नागपूर विभाग एकूण- 55

⦁ भंडारा- 4
⦁ चंद्रपूर- 11
⦁ गडचिरोली- 3
⦁ गोंदिया- 4
⦁ नागपूर- 27
⦁ वर्धा- 6

ताज्या बातम्या

राहुल

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर...