दिल्ली | वृत्तसंस्था
विधान सभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त मताधिक्य मिळविलेला पक्ष ठरल्या नंतर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपला राजीनामा दिला होता. नवीन सरकार स्थापन होई पर्यंत काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे कडे जवाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा– Judgment of the Court : अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
परंतु दिल्लीच्या हायकमांडचा निर्णय बाकी असल्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेत त्यांच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार हे स्पष्ट संकेत आहे.मात्र यात नेमके मुख्यमंत्री पदी कोण विराज मान होणार याचा निर्णय झालेला नाही.
हे देखील वाचा – Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा
दरम्यान पुढील दोन दिवसात भाजप गट नेत्याची निवड होणार असून त्यावरून मुख्यमंत्री कोण होणार असल्याचे कळते.भाजपा कडे महसूल आणि गृह खाते देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. अजित पवार यांचे कडे उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते मिळणार असल्याचे कळते त्याच प्रमाणे शिंदेंच्या शिवसेनाला नगरविकास खात तसेच pwd खात मिळणार असल्याचे कळते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा