Sunday, February 9, 2025
Homeक्राईमCyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना...

Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisement -

बँकेचा अधिकृत अधिकारी असल्याचे सांगत आधारकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्हॉटसअ‍ॅपवर लिंक पाठवून भामट्याने गोपनीय माहिती मिळवून ऑनलाईन तीन लाखांची फसवणूक केल्यचा प्रकार घडला आहे.

हे देखील वाचा- संपादकीय : २७ नोव्हेंबर २०२४ – सुवर्णमध्य समाजमान्य ठरू शकेल

आनंद वासुदेव माळोदे (५२, रा. आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना मोबाईलवर संशयिताने संपर्क साधला आणि आधारकार्ड अपडेट करण्याचा बहाणा करीत बँकेचा प्राधिकृत अधिकारी असल्याचे भासविले. माळोदे यांना मोबाईलवर इंडिया बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगत व्हॉटसपवर लिंक पाठविली.

हे देखील वाचा – Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू

ती लिंक ओपन केल्यानंतर भामट्याने त्यांच्या मोबईलचा ताबा घेत बँक आणि एटीएमची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर भामट्याने माळोदे यांच्या बँक खात्यातून २ लाख ९९ हजार ९४५ रुपये वर्ग करून घेत त्यांची फसवणूक केली. आडगाव पोलिसात आयटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या