Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad New Members: सातव, जठार, नाईक, कोल्हे…विधान परिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांनी...

Vidhan Parishad New Members: सातव, जठार, नाईक, कोल्हे…विधान परिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

मुंबई | Mumbai
विधान परिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव अशा १० नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) नीलम गोऱ्हे यांच्यापासून शपथविधीला सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व १० नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.

- Advertisement -

यावेळी शिवसेनेचे बच्चू कडू, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे, त्यानंतर भाजपच्या प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी परिषदेतील आमदारकीची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते.

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

१० जागांसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुक बिनविरोध झाली. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार होती. १२ मे रोजी विधान परिषदेच्या या १० जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु १० जागांसाठी १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपच्या ६, शिवसेना शिंदे गटाच्या २, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा १ आणि शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी) च्या एका उमेदवाराचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...