Thursday, May 1, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प - मुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra News : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई | Mumbai 

आज ०१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) राज्यातील सर्व जनतेला \शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुंबईतील (Mumbai) हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान देणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्राला (Maharashtra) भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करणारा महाराष्ट्र भारताच्या विकासात सातत्याने अग्रस्थान घेत आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले.

तसेच “महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था (Trillion Dollar Economy) बनवण्याचा संकल्प असून, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून सर्वांना सोबत घेऊन एक प्रगत आणि समावेशी महाराष्ट्र घडवायचा आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा संकल्प नवी ऊर्जा देणारा ठरेल”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक, पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Narendra Modi : भारताच्या विकासात महाराष्ट्राची महत्वाची भूमिका !

0
नवी दिल्ली | New Delhi 65 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त (65 Maharashtra Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताच्या विकासात महाराष्ट्राच्या योगदानाचे कौतुक करत...