Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBabanrao Lonikar : "तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बूट..."; भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं...

Babanrao Lonikar : “तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बूट…”; भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त विधान

मुंबई | Mumbai

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अंशातच आता पुन्हा एकदा बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लोणीकरांच्या या वक्तव्याची राजकीय (Political) वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केले जात आहे.

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील (Jalna District) परतूर (Partur) येथील सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, “कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केले आहे”, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

YouTube video player

तसेच “नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सहा हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या मायच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहीण योजनेतून पैसे दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायातली चप्पल आमच्यामुळेच, हातातले ते मोबाईलचं डबडं आमच्यामुळेच आहे. आमचंच घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो”, असंही बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...