Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar : आमदार रोहित पवारांविरोधात ED कडून 'या' प्रकरणात आरोपपत्र दाखल;...

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांविरोधात ED कडून ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल; एक्सवर पोस्ट करत म्हणाले, “कुणाचं आणि काय…”  

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा (Maharashtra Cooperative Bank scam) प्रकरणात अडचणी वाढणार आहेत. कारण त्यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल करत अनेक आरोप केले आहेत. हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ साली नोंदवला होता. तपास यंत्रणेनुसार, शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने सहकारी साखर कारखाना त्यांच्या नातेवाईकांना आणि खासगी व्यक्तींना अतिशय कमी दरात विकला होता. त्यानंतर आता ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

- Advertisement -

ईडीचा कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या (Kannada Cooperative Sugar Factory) लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यानंतर आता शिखर बँक घोटाळा प्रकरणातही रोहित पवार यांना पुरवणी आरोपपत्रात ईडीने आरोपी बनवले आहे. यापूर्वी रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोची ५० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तसेच त्यांची दोन वेळा ईडीकडून चौकशी देखील झाली होती. त्यानंतर आता ईडीने पुरवणी आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करत आणखी काही आरोप ठेवले आहेत. या सर्व प्रकरणानंतर रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

YouTube video player

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे! असे रोहित पवारांनी पोस्टमध्ये (Post) म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...