Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजED Raids : नाशिक, मुंबई, वसई-विरारसह महाराष्ट्रात १२ ठिकाणी ईडीची छापेमारी; प्रकरण...

ED Raids : नाशिक, मुंबई, वसई-विरारसह महाराष्ट्रात १२ ठिकाणी ईडीची छापेमारी; प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

सक्तवसुली संचालयाने (ईडी) नाशिक (Nashik) मुंबई, वसई-विरारसह १२ ठिकाणी छापे (Raids) टाकले आहेत. वसई-विरार परिसरातील (Vasai-Virar) अनधिकृत बांधकाम प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर तेथील महापालिकेतील मोठ्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानासह वरील ठिकाणी छापा टाकल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार (Anil Kumar Pawar) यांच्या वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी साडे सात वाजता ईडीने छापेमारी केली आहे. डंपिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कालच (सोमवारी) पवार यांनी वसई-विरार महापालिकेतील आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हाती सुपूर्द केला होता. त्या घटनेला काही तास उलटत नाही तोपर्यंत ही छापेमारी करण्यात आली आहे.

YouTube video player

दरम्यान, यापूर्वी ईडीने वसई-विरार शहरातील बिल्डर, आर्किटेक्ट आणि महानगरपालिकेचे अधिकारी वाय. एस. रेड्डी यांच्यावरही याच प्रकरणी छापे टाकले होते. सध्या ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. हे प्रकरण वसई, विरार, नालासोपारा पूर्वेकडील ४१ अनधिकृत इमारतींशी संबंधित आहे, ज्या डंपिंग ग्राउंडवर बेकायदेशीरपणे बांधल्या गेल्या होत्या. या प्रकरणाची ईडीकडून (ED) सखोल चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या