मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांना (Women) १५०० रुपये मिळतात. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारने (State Government) महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. मात्र, या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
त्यानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते. मात्र महिलांना ई केवायसी (e-KYC) करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकारकडून ई केवायसीला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर आता सरकारकडून ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आली असून, पुढील काही दिवसांत महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी केले आहे.
यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Mnister Aaditi Tatkre) यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली.
तसेच १८ सप्टेंबर २०२५ पासून लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांशी लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करते, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँख खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिनाअखेरपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे काही नियम बदलल्याने आता या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर पात्र महिलांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दिवाळीमुळे राज्य सरकार पैसे जमा करू शकेल नव्हते. त्यानंतर आता महिनाअखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसै जमा होऊ शकतात.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करावी?
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
- यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
- यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडीलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
- त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील.
१) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
२) माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटण दाबावे.
३) शेवटी Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल.





