Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याBachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडूंचे उपोषण तुर्तास स्थगित; सरकारला...

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडूंचे उपोषण तुर्तास स्थगित; सरकारला दिला ‘या’ तारखेपर्यंत अल्टीमेटम

अमरावती | Amravati

मागील सात दिवसांपासून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे विविध मागण्यासाठी अमरावती (Amravati) येथील मोझरीमध्ये अन्नत्याग उपोषण (Hunger Strike) सुरु असल्याने कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर अखेर बच्चू कडू यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.

- Advertisement -

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी सामंत यांनी कडू यांना लेखी पत्र दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आश्वासन दिले, तेच पत्र उदय सामंत यांनी बच्चू कडूंना दिले आहे. यानंतर कडू यांनी ०२ ऑक्टोबरपर्यंत सरकारला कर्जमाफीसाठी मुदत दिली. तसेच मागण्या मान्य न केल्यास ०२  ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कडू यांनी दिला. त्यानंतर मंत्री सामंत यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन कडू यांनी आपले उपोषण स्थगित केले.

YouTube video player

मागण्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न

उदय सामंत यांनी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी ३० जून रोजी विशेष बैठक घेण्याचे आणि याबाबत अधिकृत पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. सामंत यांनी पत्रातील सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आपले अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले. तसेच, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही यावेळी बच्चू कडूंनी दिला.

अजित पवारांच्या कार्यक्रमात ‘प्रहार’ च्या कार्यकर्त्यांचा राडा

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाचे पडसाद आज पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात उमटतांना बघायला मिळाले.  ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना (Farmer) कर्जमाफी देण्यासह माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्या अशी मागणी अजित पवार यांच्यासमोर केली होती. तसेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कार्यक्रमात घोषणा दिल्या आणि अजित पवार यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...