Monday, April 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे शपथबद्ध

Maharashtra News : मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे शपथबद्ध

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे (Rahul Pandey) यांनी सोमवारी आपल्या पदाची शपथ (Oath) घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना मुख्य माहिती आयुक्त पदाची (Chief Information Commissioner)  शपथ दिली. रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनाही यावेळी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ देण्यात आली.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा  छोटेखानी शपथविधी समारंभ पार पडला. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.

दरम्यान, शपथविधी सोहळ्याला (Swearing Ceremony) विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती आणि  जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या