Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; राज ठाकरे तात्काळ घटनास्थळी...

Raj Thackeray : मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; राज ठाकरे तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई | Mumbai

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून, अज्ञात समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे नेते दाखल झाले. त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता केली. या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दाखल होत पाहणी केली.

YouTube video player

यावेळी राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा (Meenatai Thackeray) पुतळा परिसरात जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेतली. या परिसरात नेमके काय घडलं आणि आतापर्यंत पोलिसांकडून (Police) काय कारवाई करण्यात आली हे देखील त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर २४ तासांच्या आत पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला शोधा अशी विनंती राज ठाकरेंनी पोलिसांना केली.

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.

ताज्या बातम्या