Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्यामी पुन्हा येईन! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

मी पुन्हा येईन! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या युती आघाड्यांनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. सुरुवातीला महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडत भाजपला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’, अशी कविता म्हटली होती. त्याच घटनेचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप घडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या