Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्याNilesh Rane : कोकणात राजकारण तापलं; आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल, स्टिंग...

Nilesh Rane : कोकणात राजकारण तापलं; आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल, स्टिंग ऑपरेशन करणं पडलं महागात

मुंबई | Mumbai

शिंदेंच्या शिवसेनचे आमदार निलेश राणे (MLA Nilesh Rane) यांच्याविरोधात बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात (Malvan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे यांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत २५ लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेमधील वाद शिगेला पोहोचला आहे. तसेच दोन्ही राणे बंधू कोकणात आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

- Advertisement -

विजय केनवडेकर हे भाजपचे (BJP) मालवणमधील पदाधिकारी असून, त्यांच्या घरी निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह अचानक गेले होते. त्यामुळे केनवडेकर आणि बंड्या सावंत या भाजप कार्यकर्त्यांची धावपळ झाली होती. त्यावेळी निलेश राणे यांनी मी कुणाच्या बेडरूममध्ये जाणार नाही. जे काय आत आहे ते बाहेर आणा असं म्हटलं होतं. त्यानंतर राणेंना कार्यकर्ते बेडरूममध्ये घेवून गेले. त्यावेळी तिथे पैशांनी भरलेली बॅग सापडली होती. त्यामध्ये पाचशे रूपयांचे बंडल आढळून आले होते. यानंतर आता याप्रकरणी आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player

दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी निवडणूक काळात मतदारांना (Voter) प्रलोभने देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा पैशांवर कारवाई होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. निवडणूक (Election) पैसा फेकून जिंकायची नसते, कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते. भारतीय जनता पक्षाचे मालवण येथे रणजीत देसाई,मोहन सावंत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर मुंबईमधून कित्येक लोक पैसे वाटण्यासाठी खास येथे आलेले आहेत, यावर निवडणूक आयोग काय शासन करणार त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असं निलेश राणेंनी म्हटले होते.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...