Thursday, May 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra By-Election : बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; असं आहे निवडणुकीचं...

Maharashtra By-Election : बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; असं आहे निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी (Central Election Commission) आज (रविवारी) आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पदुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली. यात पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात तर तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पदुचेरी या राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. या पाच राज्यांसोबतच निवडणूक आयोगाने देशातील वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभांच्या आठ रिक्त जागांसाठी देखील पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

- Advertisement -

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे विधानसभेच्या या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर आज निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिलला मतदान होईल.तर ४ मे रोजी या दोन्ही पोटनिवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे.

हे देखील वाचा : Central Election Commission : अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

बारामती आणि राहुरीत उमेदवार कोण?

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. कायद्यानुसार एखाद्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे उमेदवार असू शकतात. त्यामुळे आता या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : ०६ एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ०९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : ०६ मे २०२६

हे देखील वाचा : Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; पाच राज्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार?

ताज्या बातम्या

संजय

Sanjay Raut: “आया-बहिणींचे कपडे फाडून…”; रिंग रोडच्या भूसंपादनावरुन संजय राऊत आक्रमक,...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिकच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादनादरम्यान महिलांना झालेल्या मारहाणीचे पडसाद आता जिल्हाधिकारी कार्यालयात उमटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...