Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : सिंहस्थात फक्त हिंदूंचीच दुकाने असली पाहिजे, मुस्लिमांची आढळले तर...;...

Nitesh Rane : सिंहस्थात फक्त हिंदूंचीच दुकाने असली पाहिजे, मुस्लिमांची आढळले तर…; मंत्री राणेंचे मोठे विधान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ हा हिंदूंचा (Hindu) उत्सव आहे या ठिकाणी फक्त हिंदूंचीच दुकाने असली पाहिजे जर पुन्हा मुस्लिमांची दुकाने या ठिकाणी आढळले तर ते दुकान उखडून टाका आम्ही मंत्रालयात बसलो आहोत असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी केले. नाशकात हिंदू हित रक्षा तर्फे आयोजित नित्य गरजांना आवश्यक अशा शेकडो हिंदू कारागीर व लघु व्यावसायिकांच्या यादीचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ यावर बोलतांना मंत्री राणे यांनी वरील विधान केले. याप्रसंगी व्यासपीठावर कामाख्या देवीचे कालीचरण महाराज, आ. सीमा हिरे, हिंदू हित रक्षाचे प्रवीण जोशी उपस्थित होते.

- Advertisement -

पुढे बोलतांना राणे म्हणाले की, मी हिंदुस्थानात हिंदूंच्या बाजूने बोललो नाही तर पाकिस्तानातील इस्लामाबाद बादमध्ये जाऊन बोलायचे का? या हिंदू राष्ट्रात सर्वधर्म समभाव व भाईचारा चालणार नाही, हे उगाच आपल्यावर आरोप करतात. मात्र, ते भाईचारा पाळतात का? त्यांना गजवाए हिंदच्या माध्यमातून २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. परंतु, आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण सतर्क व जागरूक राहायला पाहिजे. कुणाच्याही जन्म व मृत्यु पत्रिकेवर हिंदू असे लिहिलेले असते, त्यावर मंत्री किंवा आमदार (MLA) असे लिहिलेले नसते. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदूंसाठी उभा आहे. आज जर आपण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले.

तसेच आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडून देण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही हिंदुत्ववादी सरकार निवडून दिले. त्यावेळी आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. लव जिहादच्या विरोधात हा संपूर्ण देशात खूपच कडक कायदा असणार आहे. आम्ही आमदार व मंत्री फक्त हिंदूंमुळे बसलो आहोत त्यांनी आम्हाला मत दिले नाही आणि आम्ही त्यांच्याकडे मत मागायला देखील गेलो नाही. सध्या माझ्याकडे मत्स्य व बंदरे खाते आहे. यापूर्वी हिंदूंच्या नावाने धरणांवर ठेके असायचे मात्र तो चालवणारा मुस्लिम असायचा. परंतु, आता ते चालणार नसून त्याचा सफाया करायचे ठरवले आहे, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंखा नाद व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, नगरसेविका उषा बेंडकुळे, नगरसेवक नितीन निगळ, सुरेश पाटील, वंदना पाटील, रामसिंग बावरी, बबलू परदेशी आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बिनविरोध

मतदानाआधीच महायुतीकडून ‘या’ जागा बिनविरोध; मविआला धक्क्यावर धक्के

0
मुंबई | Mumbaiराज्यात १७ जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे....