मुबंई | Mumbai
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंगला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) ३५ हजारांची लाच घेताना पकडल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावरून राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल (सोमवारी) देवगिरी बंगल्यावर झालेल्या आमदारांच्या बैठकीत झिरवाळ यांना ‘स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यावी. प्रशासनातील अधिकार्यामुळे बदनामी होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना केल्या. यानंतर आज (मंगळवारी) झिरवाळ यांनी माध्यमांशी संवाद साधत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले.
हे देखील वाचा : NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी DCM सुनेत्रा पवारांचे नाव निश्चित! ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा
यावेळी ते म्हणाले की,” मला या सगळ्याची कुठलीही कल्पना नव्हती. माझं ऑफिस आणि अन्न न औषध प्रशासनाचे कार्यालय हे मंत्रालयात जवळ असले तरी प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसण्याच्या व्यवस्थेजवळ जाऊन कधी पाहण्याचा प्रसंग आला नाही. पण मंत्रालयात जो काही प्रकार घडला तो कलंक लावणारा आहे. मी तात्काळ लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.सध्या ढेरिंगे हे पोलीस कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन सहआयुक्त दक्षता,पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचा गोपनीय अहवाल मला प्राप्त झाल्यानंतर राजेंद्र ढेरिंगे यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
पुढे झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरी (Bribe Case) सुरु असल्याच्या अनेक तक्रारी एसीबीला गेल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, “असे कधी घडले नाही, त्याची प्रक्रिया आहे. सुनावणी घेणं, सुनावणीनतंर स्थगिती देणे, निलंबन करणे, अपूर्णतांची पूर्तता झाली की नाही, ही सर्व दैनंदिन प्रक्रिया होती. बळजबरीने सही करून घेणे असं कधीही झालेले नाही”, असंही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले. तसेच राजू ढेंरेंगे यांनी कुठल्याही प्रकारे विधान केलेले नाही की, लाचखोरीच्या प्रकरणात आमच्या ओएसडी यांचा सहभाग आहे. त्यांनी स्वत:साठी लाच घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : DCM Sunetra Pawar : मंत्री झिरवळांवर ‘त्या’ प्रकरणावरून सुनेत्रा पवारांची नाराजी; थेट स्पष्ट शब्दात म्हणाल्या…
मंत्रिपदाबाबत स्पष्टच बोलले
नरहरी झिरवाळ यांना माध्यम प्रतिनिधींनी ‘कुणी हे जाणीवपूर्वक करत आहे का? मंत्रीपद काढून घेण्यासाठी इच्छुक दबाव आणत आहेत का? असा प्रश्न विचारला असता त्यावर बोलतांना ते म्हणाले की, “माझ्या बाबतीत मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझे कुणासोबत वैर नाही किंवा मुद्दाहून कोणी बदनाम करत आहे असं वाटत नाही. तसेच कुणाला मंत्रिपद द्यावं आणि काढावं, हा मुख्यमंत्री महोदय यांचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व निर्णय ते घेतील. बाकी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात माझे कोणी वैरी नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप माझे बोलणे झालेले नाही. मी त्यांना भेटणार आहे, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.





