मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना अशक्तपणा जाणवत आहे. शरद पवार नुकतेच पाच दिवस रुग्णालयात राहून घरी परतले होते. मात्र, आता त्यांना पुन्हा रुग्णालयात (Hospital) दाखल आले आहे.अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. अजित दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकार्यांसाठी आधारवड असणाऱ्या शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माहिती दिली आहे. आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्ट बाकी आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करत आहोत, असे त्यांनी म्हटले.





