Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : अखेर मुख्यमंत्रि‍पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, "ज्यांचे…"

Sharad Pawar : अखेर मुख्यमंत्रि‍पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “ज्यांचे…”

मुंबई | Mumbai

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राजकारणातून निवृत्त होणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. तर दुसरीकडे निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा (CM Post) चेहरा कोण असेल अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत हे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसू. ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे”, असे शरद पवारांनी म्हटले. तसेच ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका (Election) जाहीर झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी महाविकासआघाडीचा (Mahavikas Aaghadi) जो कोणीही उमेदवार असेल, त्याच्या पाठीशी आपण राहू असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

हे देखील वाचा :  Nashik News : स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची लगबग; दोन लाख ४० हजार मतदारांना मिळणार ओळखपत्र

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेसला (Congress) मोठे यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण असे केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते असे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर राष्ट्रवादीकडून (NCP) कोणतीही भूमिका स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला जाहीर केला नाही किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केला नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या