Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक संपली; काय चर्चा झाली?

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक संपली; काय चर्चा झाली?

मुंबई | Mumbai

शिवसेना उद्धव बाळाासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत बैठक झाली आहे. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झालेल्या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती.

- Advertisement -

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता नवीन राजकीय समीकरणे मांडण्यांचा प्रयत्न होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा वाटपाबाबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजीदेखील उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही लगेच याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या