Saturday, January 31, 2026
Homeमुख्य बातम्याSunetra Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची एकमताने निवड

Sunetra Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची एकमताने निवड

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याआधी दुपारी २ च्या सुमारास विधानभवनातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : दादांची सावली मंत्रालयात; सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज शपथविधी

YouTube video player

राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सुरुवातीला अजित पवारांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा गटनेते पदासाठी (Group Leader) प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार दिला. यानंतर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी नियुक्ती झाली. प्रदेशाध्यक्ष तटकरे गटनेता निवडीचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : सामाजिक कार्य, अजितदादांना राजकारणात खंबीर साथ ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अशी आहे सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल

दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यांनतर सुनेत्रा पवार आता थोड्याच वेळात राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा (MP Post) राजीनामा सुपूर्द करणार आहेत. या राजीनाम्यानंतर आज (शनिवारी) संध्याकाळी ५:३० वाजता सुनेत्रा पवार लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अवघ्या १० मिनिटांत शपथविधीचा हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हे देखील वाचा :  Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मंत्री भुजबळांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “त्यांना उपमुख्यमंत्री करणे…”

बैठकीला कोण कोण उपस्थित?

नेता निवडीच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सगळेच मंत्री, पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सगळेच आमदार उपस्थित होते. या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यावर राज्यसभेतील त्यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांना पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्वही त्यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याचे समजते. तसेच पार्थ पवारांची देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पार्थ पवारांची राज्यसभेवर खासदारपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

ताज्या बातम्या

Sanjay Shirsat : “दुखवटा संपण्याआधीच शपथविधी, माणसापेक्षा खुर्चीला…”; राजकीय घडामोडींवर शिरसाटांचं...

0
मुंबई । Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा दुखवटा अद्याप सरला नसतानाच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या घाईघाईने...