Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : येवला वगळता शरद पवारांचे सर्व दौरे रद्द; 'हे' आहे...

Sharad Pawar : येवला वगळता शरद पवारांचे सर्व दौरे रद्द; ‘हे’ आहे कारण

मुंबई | Mumbai

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंद केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरे करणार असल्याची घोषणा केली…

- Advertisement -

अजित पवार आणि इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट दिली आणि लवकरच राज्यात दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र तूर्तास शरद पवारांचे दौरे तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ : फोडाफोडीत वाढली इच्छुकांची गर्दी

राज्यात पावसाचे वातावरण असल्याने सध्यातरी नजीकच्या काळातील दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत. शरद पवारांच्या दौऱ्याचे नियोजन करावे लागेल. त्यानंतर माहिती माध्यमांना दिली जाईल, असे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहे.

शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रात दौऱ्याचे नियोजन केले होते. नाशिक, धुळे, जळगाव याठिकाणी पवारांच्या सभा होत्या. आता केवळ येवल्याची सभा होणार आहे. त्यानंतरच्या दौऱ्यात आता बदल करण्यात आला आहे. शरद पवार येवल्याहून मुंबईला परतणार असून पुढील आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघ : उमेदवार कोणाचा?

- Advertisment -

ताज्या बातम्या