मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला होता. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) चांगलीच मुसंडी मारली होती. या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) महायुतीने घवघवीत यश मिळविले होते. त्यानंतर महायुतीने सत्ता स्थापन करत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले.
या निवडणुकीत भाजप (BJP) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी (Assembly Speaker) पुन्हा भाजप आमदार राहुल नार्वेकर (MLA Rahul Narvekar) यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा उपाध्यक्षपदासाठी मंगळवार (दि. २५ मार्च २०२५ ) रोजी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर बुधवार (दि. २६) रोजी उपाध्यक्षाची निवड (Selection) होणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे सभापतीपद हे भाजपच्या तर उपसभापतीपद शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) वाट्याला गेले आहे. त्यामुळे आता महायुतीत विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता राष्ट्रवादीकडून विधानसभा उपाध्यक्षपद (Vice President) कुणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.