Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेची आज सुनावणी

MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेची आज सुनावणी

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या घडामोडींमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. राज्यात स्थिर सरकार असलं तरी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निर्णय येणं अद्याप बाकी आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. याच प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दलची सुनावणी गुरुवारी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे जमा करण्याची मुदत बुधवारी संध्याकाळी ४ वाजता संपली आहे. त्यानंतर यासंबधित ३४ याचिकांचे सहा गट तयार करून त्यावर सुनावणी होणार आहे.

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी गुरुवारी दुपारी ४ वाजता विधानभवनात पार पडणार आहे. या सुनावणी सुनावणीत वर्गवारी करण्यात आली असून ३४ वेगवेगळ्या याचिका आता यापुढे ६ गटात मांडल्या जातील.

दरम्यान, सुप्रीम कोर्टातील ३० ऑक्टोबरच्या सुनावणीआधी आमदार अपात्रता प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष सुनावणींचे वेळापत्रक ठरवणार आहेत. त्यासाठी ते महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

याशिवाय विधानसभा अध्यक्ष याच आठवड्यात दिल्लीला देखील जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष दिल्लीला जावून देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांची भेट घेणार असून आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आणि याचिकांचे वेळापत्रक ठरवणार ते त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या