Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज शक्तिप्रदर्शन

Maharashtra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज शक्तिप्रदर्शन

मेळाव्यातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) जय-पराजयाचे कवित्व बाजूला सारत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दोन्ही गट आज, गुरुवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आज अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तर एकनाथ शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला संकुलात मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला पराभवाचा जबर धक्का बसला. विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर उद्धव ठाकरे गटात प्रचंड नाराजी आहे. अनेक माजी आमदार आणि निवडणुकीतील पराभूत उमेदवार ठाकरे गटाची साथ सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. अशातच पक्षाने विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा न केल्याने आमदार नाराज आहेत. याशिवाय विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) बाहेर पडण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रथमच सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक निकाल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती भूमिका मांडणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवोत्सव

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाने (Won) आत्मविश्वास दुणावलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी निवडणुका शिंदे गटाच्यावतीने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात शिंदे हे उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. शिंदे गट स्थानिक निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची शक्यता असली तरी एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करू शकतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...