Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

Maharashtra Politics : महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhansabha Election) निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर महायुतीमधून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी (CM) कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून महायुतीमध्ये (Mahayuti) सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार असून उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

YouTube video player

यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या तीनही नेत्यांनी यावेळी राज्यपालांना आपल्याला असणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. त्यानंतर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महायुती सरकारला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यानुसार उद्या सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची (CM Post) शपथ घेणार आहेत.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “मी महाराष्ट्राच्या जनतेला…”; गटनेतेपदी निवड होताच फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, उद्या (दि.०५ डिसेंबर) रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह किती मंत्र्यांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. तसेच काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी त्यांना आपण सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी विंनती केली आहे. त्यामुळे ते आमच्या विनंतीचा मान ठेऊन सरकारमध्ये सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....