Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govertment) मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याचा पेच अखेर सुटला आहे. आज विधिमंडळात भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपच्या विधिमंडळ गटनेता (Group Leader) निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाचा गटनेतेपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी (MLA) फडणवीस यांच्या नावाला सहमती दर्शविली. त्याआधी विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

हे देखील वाचा : Sukhbir Singh Badal: मोठी बातमी! शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न Video

दरम्यान, उद्या (दि.०५ डिसेंबर रोजी) सायंकाळी ५.३० वाजता महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री आणि काही आमदार आझाद मैदानावर मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे महायुती सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे. यात भाजपचे २०, शिवसेना शिंदे गटाचे १२, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९ मंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या