मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने (Congress) मनसेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या बैठकीत ‘इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच युती केली जाईल, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पंरतु, मनसेसोबत (MNS) युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीची तयारी दर्शवली आहे. मात्र केवळ इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच युती केली जाणार असल्याचे कॉंग्रेसचे
तर इंडिया आघाडीसोबत (India Aaghadi) नसलेले पक्ष म्हणजेच मनसेसोबत युती न करण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेत्यांचे एकमत झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून लवकरच या निर्णयाची माहिती दिल्ली हायकमांडला दिली जाणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




