Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकMaharashtra Politics : कोकाटेंना 'बळ' देत अजित पवारांची भुजबळांविरोधात नवीन खेळी

Maharashtra Politics : कोकाटेंना ‘बळ’ देत अजित पवारांची भुजबळांविरोधात नवीन खेळी

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना स्थान न मिळाल्यामुळे भुजबळांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. तसेच छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. राष्ट्रवादीकडून भुजबळांची नाराजी दूर केली जाईल, असे सांगण्यात आले होते. पण आता छगन भुजबळ यांच्याविरोधात अजित पवार यांनी नवी खेळी केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची कॅबिनेट मंत्रि‍पदी वर्णी लावत त्यांना कृषीमंत्रीपद दिले. छगन भुजबळ यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना बळ दिल्याचे बोलले जात आहे. मंत्रि‍पदाची शपथ (Oath) घेतल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत असून ते येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे अजित पवारांनी टाकलेल्या या डावाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

दरम्यान, संपूर्ण नाशिक जिल्ह्याला (Nashik District) छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांचे राजकीय वैर चांगलेच माहिती आहे. भुजबळ यांना उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. त्यानंतर आता मंत्री झाल्यावर कोकाटे यांचा पहिला दौरा येवला असल्यानेराष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमधील वादाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. तर दुसरीकडे भुजबळ यांच्या मंत्रि‍पदाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी (MLA) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एकमुखाने विरोध केल्यामुळे त्यांचे मंत्रिपद हुकल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...