Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : एकनाथ शिंदेंची अर्थखात्यावर नाराजी; फाईल्स मंजूर होत नसल्याची शहांकडे...

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची अर्थखात्यावर नाराजी; फाईल्स मंजूर होत नसल्याची शहांकडे तक्रार

मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यात (Pune) केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन आपली नाराजी उघड केली. यावेळी शिवसेना आमदारांना (Shivsena MLA) निधीवाटप करताना दुजाभाव केला जात असल्याची तक्रारही त्यांनी केल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील शीतयुद्ध आता दिल्ली दरबारी गृहमंत्र्यांच्या कानावर पोहोचल्याचे दिसून येते.

- Advertisement -

महायुतीत (Mahayuti) सर्वकाही आलबेल नसल्याची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. त्यातच एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचे तसेच फाईली अडवून ठेवण्यात येत असल्याचे सांगत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) खात्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीत निधीवाटपावरून झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या विकासकामांत अडथळा निर्माण होत असल्याचे देखील शिंदेंनी सांगितले. जर महायुतीत आहोत तर निधीवाटप आणि फाईल क्लिअरन्स एकसमान झाले पाहिजे, अशी मागणी शिंदे यांनी शहा यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्रिपदाबाबत चर्चा नाही

अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी पोहोचले. यावेळी अमित शहा यांच्यासोबत काय चर्चा झाली? पालकमंत्रिपदाबाबत नेमके काय ठरले? अशा प्रश्नांवर सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दात या भेटीत रायगड आणि नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...