Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये झाडाझडती; १७ डिसेंबरला नागपूरमध्ये बैठक

Maharashtra Politics : पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये झाडाझडती; १७ डिसेंबरला नागपूरमध्ये बैठक

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) काँग्रेसला (Congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आता या पराभवाची कारणमीमांसा करणार असून पदाधिका-यांची झाडाझडती घेणार आहेत. येत्या १७ तारखेला नागपूर (Nagpur) येथे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार तसेच पराभूत उमेदवार यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) अंतर्गत १०१ जागा लढविल्या होत्या. पण त्यापैकी केवळ १६ जागांवरच त्यांना यश मिळविता आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासारख्यांना देखील पराभव पत्करावा लागला. आता या मानहानीकारक पराभवाचे पडसाद पक्षात उमटायला सुरूवात झाली आहे. विधिमंडळ अधिवेशन तोंडावर असताना काँग्रेसला अद्याप विधिमंडळ गटनेता (Legislature Group Leader) निवडता आलेला नाही. सोमवारपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आता झाडाझडती सुरू होणार आहे.

दरम्यान, रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) १७ तारखेला काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार, विधान परिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. नागपूर येथे होत असलेल्या या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे, असे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...