Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : मनसे नेते संदीप देशपांडेंचे वादग्रस्त विधान; म्हणाले, "विधानभवनात सर्व..."...

Maharashtra Politics : मनसे नेते संदीप देशपांडेंचे वादग्रस्त विधान; म्हणाले, “विधानभवनात सर्व…”  

मुंबई | Mumbai

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या नेतृत्वाखाली दादरच्या एका शाळेबाहेर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी ‘आम्ही सरळ मार्गाने आंदोलन (Agitation) करत आहोत तोपर्यत सरकारने दखल घ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नका, अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असे म्हटले. तसेच यावेळी संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका करतांना विधानसभेत (Vidhansabha) सर्व षंढ बसले आहेत, अशी बोचरी टीका देखील केली. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) शांततेच्या मागनि आंदोलन करत आहे. सरकारने याची दखल घ्यावी. उद्या महाराष्ट्रभर आम्हाला उग्र आंदोलन करण्यास भाग पाडू नये. आम्ही रस्त्यावर उतरलो तर त्याची जबाबदारी सरकारची (Government) असेल. मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरण सरकारला कठीण होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी (Marathi) माणसाने करायचं काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

YouTube video player

तर संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मनसेला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा अवमान केला आहे. षंढ या शब्दावरून हक्क भंग आणू. तसेच शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी ‘भाषा समजण्यासाठी संदीप देशपांडे यांना निवडून यावं लागेल’, असे त्यांनी म्हटले आहे.

‘त्या’ विधानावर देशपांडे यांनी दिले स्पष्टीकरण

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “षंढ हा शब्द मी व्यक्तीबद्दल नाही प्रवृत्तीसाठी बोललो आहे. त्याबद्दल मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल मात्र, मी माझ्या विधानावर ठाम आहे. तसेच मी कुठल्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. माझा शब्द चुकला असेल; पण तुम्ही विचार करा. मी मराठी भाषेसाठी तुरूंगात जाईन. कोणताही कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे तर तिथे मराठी असायला पाहिजे. महाराष्ट्र विधीमंडळातील कार्यक्रमात हिंदी आणि इंग्रजी भाषेत मजकूर लिहिला जातो. आपली भाषा आपण जपली पाहीजे”, असे त्यांनी म्हटले.

अबू आझमींना पुन्हा एकदा कानाखाली द्यावी लागेल

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी काल वारीबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाचा देखील संदीप देशपांडे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, ” आझमी यांना कानाखाली पडलेली ते विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...