Wednesday, February 4, 2026
Homeमुख्य बातम्याThackeray Brothers Alliance : अखेर ठरलं! उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार;...

Thackeray Brothers Alliance : अखेर ठरलं! उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार; संजय राऊतांची माहिती

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Shivsena UBT and MNS) महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. याबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचा सिलसिला सुरु होता. यानंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला असून, उद्या (बुधवारी) ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

- Advertisement -

राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा ‘मातोश्री’मधील एक फोटो ट्विट करत ‘उद्या १२ वाजता’ अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. त्यामुळे उद्या दुपारी १२ वाजता राज आणि उद्धव ठाकरे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करतील. या पत्रकार परिषदेत दोन्ही बंधू कोणता पक्ष किती जागा लढणार याची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player

दरम्यान, खासदार राऊत यांनी ट्विटमध्ये ठाकरे बंधू युतीची घोषणा कुठे करणार याबाबत काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे एका हॉटेलमध्ये राज आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत कोण किती जागांवर लढणार आणि कुठल्या महापालिकेसाठी युतीत लढणार हे देखील स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...